देव अजब गारोडी बहिणाईंच्या कविता
Posted byधरीत्रीच्या कुशीमधी
बी बियानं निजली
वऱ्हे पसरली माटी
जशी शाल पांघरली
बी टरारे भुईत
सर्वे कोंब आले वऱ्हे
गय्ह्रले शेत जसं
अंगावरती शहारे
उन वार्याशी खेयता
एका एका कोम्बातून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जसे करती कारोन्या
होऊ दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाले बहर
झाली शेतामधी दाटी
कसे वारयानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी
0 comments:
Post a Comment