अरे संसार संसार

Posted by Monika shinde

 अरेसंसार संसार

जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके,
तव्हा मिळते भाकर.


अरेसंसार संसार
खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले,
लोटा कधी म्हनू नहीं.


अरेसंसार संसार,
नही रडनंकुढनं
येड्यागयांतला हार,
म्हनू नको रे लोढनं.


अरेसंसार संसार,
खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू,
बाकी अवघा लागे गोड.


अरेसंसार संसार,
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल,
मधी गोडंब्याचा ठेवा.


देखा संसार संसार,
शेंग वरतून काटे
अरेवरतून काटे,
मधी चिक्ने सागरगोटे.

ऐकासंसार संसार,
दोन्ही जीवांचा इचार
देतो दुःखाले होकार,
अन्‌ सुखाले नकार.


देखासंसार संसार,
दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार,
सुखदुःखाचा बेपार .


अरेसंसार संसार,
असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर,
त्याच्यावरती मदार.


असासंसार संसार,
आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार,
मग जीवाचा आधार .



बहिणाबाई चौधरी

0 comments:

Post a Comment